आई... - Marathi, Hindi Kavita || मराठी, हिंदी कविता, Jokes, Quotes, Stories. Rohan Banekar.

Breaking

Home Top Ad

Sticky Ad - Desktop only

Friday, June 28, 2013

आई...




~ . . . . आई . . . . . ~

आई तुझ्या अपरंपार कष्टाच
आज बीज होऊ दे
डोळे मिटून बसलेल्या नशिबाचे
आज चीज होऊ दे

तु पार केलेस डोंगर दुःखाचे
पाखरांच्या पोटात जाळ होऊ दे
किती सहन केलस आयुष्य यातनांच
आज मला तुझे आभाळ होऊ दे

सांधत राहिलीस फाटका संसार
तुझ्या सहिष्णुतेचे बळ होऊ दे
तुझ्या दुभंगलेल्या स्वप्नांना सांधणार
आज मला ठिगळ होऊ दे

भरवलेस घास उपाशीपोटी
तुझ्या तृप्तीचा ढेकर होऊ दे
आयुष्यभर झिजलीस जिच्यासाठी
आज मला ती भाकर होऊ दे

तुझ्या अथांग मायेची ऊब
माझ्या जगण्याच सार होऊ दे
कळले नाही देवपण तुझे
मला
तुझ्या मंदिराचे द्वार होऊ दे

ऊन वादळात जपलस घरट्याला
झाडाला सावरणार मूळ होऊ दे
कळली नाही पतझड तुझी
मला
तुझ्या चरणाची धूळ होऊ दे

ओंजळीत जपलस आयुष्य माझे
माझ्या चरणावर वाहिलेल फुल होऊ दे
मागून मागून काय मागू

पुन्हा मला तुझ्या कडेवरच मूल होऊ दे

No comments:

Post a Comment