डोळ्याना सांगीतलय मी, आज रात्र जागायची आहे - Marathi, Hindi Kavita || मराठी, हिंदी कविता, Jokes, Quotes, Stories. Rohan Banekar.

Breaking

Home Top Ad

Sticky Ad - Desktop only

Monday, June 24, 2013

डोळ्याना सांगीतलय मी, आज रात्र जागायची आहे



डोळ्याना सांगीतलय मी, आज रात्र जागायची आहे ऐकलय  की,
तुझी आठवण येणार आहे.
आज परत मला,
ती माझ्यातूनच नेणार आहे...
डोळ्याना सांगीतलय मी,
आज त्याला त्याच्याकडुनच मागायचं आहे,
पापण्यानो तुम्ही मिटू नका ,
आज रात्र जगायची आहे....
ए चंद्रा जरा एकडे बघ,
त्याची आठवण येणार आहे...
तुझ्या सौम्य प्रकाश दे,
मला आठवणीत तो आज भेटणार आहे..
ए अश्रू, तू थांब रे,
इतके दिवस आलास ना..
माझा म्हणता म्हणता,
तू ही त्याचाच झालास ना...
तू आलास की,
पापण्या मग मिटायच म्हणतात..
ए पापण्यानो तुम्ही मिटू नका,
निघालेल्या प्रत्येक अश्रुची कथा ..
आज त्याला सांगायची आहे...
डोळ्याना सांगीतलय मी,
आज रात्र जागायची आहे....

No comments:

Post a Comment