
खेळ सगळे मांडून ज़ाले
सगळे उपाय करुन ज़ाले.
जुने औषध वापरुन ज़ाले.
सक्तित बसुन कंटाळली सारी.
हे ईश्वरा, संपव खेळ आतातरी!
खुप स्वछता करुन ज़ाले.
हात धुवून पांढरे ज़ाले.
तोंडावर रुमाल लावून ज़ाले
अंतर ठेवून बोलून ज़ाले.
सक्तित बसुन कंटाळली सारी.
हे ईश्वरा, संपव खेळ आतातरी!!
घरात कोंडुन ज़ाले.
चार भिंतीशी बोलून ज़ाले.
कोपरान कोपरा बघुन ज़ाले.
सक्तित बसुन कंटाळली सारी.
हे ईश्वरा, संपव खेळ आतातरी!!
उगाच हसून ज़ाले.
दुख पाहून रडून ज़ाले.
मनातल्या मनात संवाद ज़ाले.
सक्तित बसुन कंटाळली सारी.
हे ईश्वरा, संपव खेळ आतातरी !!
पुढची स्वप्न पाहण्यासाठी.
ती पुर्ण करण्यासाठी.
त्यात डुंबून जाण्यासाठी.
सक्तित बसुन कंटाळली सारी.
हे ईश्वरा, संपव खेळ आतातरी!!
पोटाची खळगी भरण्यासाठी.
हातावरिल कामासाठी.
मांडून ठेवलेल्या डावासाठी.
सक्तित बसुन कंटाळली सारी.
हे ईश्वरा, संपव खेळ आतातरी!!
सहनशीलता संपण्यापूर्वी.
आमचा धीर सुटण्यापूर्वी .
तुज्यावर सवाल उठण्यापूर्वी
सक्तित बसुन कंटाळली सारी.
हे ईश्वरा, संपव खेळ आतातरी!!
माता पित्याना वेळ देईंन.
परिवार, मित्राना महत्व देईन
मुक्या जनावराशी संवाद साधेन.
पशुपक्षीशी हितगुज करेन
सक्तित बसुन कंटाळली सारी.
हे ईश्वरा, संपव खेळ आतातरी!!
ईतके शासन करुन ज़ाले.
आमची पत कळून चुकले.
मनशुद्धी करुन ज़ाले.
आम्ही सगळे शून्य सारी
सक्तित बसुन कंटाळली सारी.
हे ईश्वरा, संपव खेळ आतातरी!!
पाया पडतो हात जोडीतो
दुबळी ज़ोळी रिकामी ज़ाली
शरण आलो तुज़्या पायाशी
सक्तित बसुन कंटाळली सारी!
हे ईश्वरा, संपव खेळ आतातरी!!
No comments:
Post a Comment