बघुनी तुझी ती रंगीत अम्ब्रेला - Marathi, Hindi Kavita || मराठी, हिंदी कविता, Jokes, Quotes, Stories. Rohan Banekar.

Breaking

Home Top Ad

Sticky Ad - Desktop only

Saturday, May 9, 2020

बघुनी तुझी ती रंगीत अम्ब्रेला

बघुनी तुझी ती रंगीत अम्ब्रेला
जीव माझ्झा कासावीस झाला
असलीस जरी तू तोंडाने फाटकी
तुझी अम्ब्रेला मात्र नीटनेटकी

रंगबिरंगी चांदण्या त्यावरी
झेलण्या ओघळण्या पाऊस सरी
कापड ऐसे तरल मुलायम
पिळवटते हे हृदय ते कायम 

सडपातळ ती नाजूक दांडी
बघणार्यांच्या उडती झुंडी
बटनावरती नक्षीदार दांडा
देती सलामी बघणाऱ्या सोंडा

काय असे ते गुपित न कळले
त्या अम्ब्रेलातच सर्व अडकले
मीही नसे अपवाद त्याला
मलाही आवडली तिचीच अम्ब्रेला

No comments:

Post a Comment