आई कुणाच्याही जन्मताच येते मुखी नांव तुझे - Marathi, Hindi Kavita || मराठी, हिंदी कविता, Jokes, Quotes, Stories. Rohan Banekar.

Breaking

Home Top Ad

Sticky Ad - Desktop only

Tuesday, June 16, 2020

आई कुणाच्याही जन्मताच येते मुखी नांव तुझे


आई

कुणाच्याही जन्मताच येते मुखी नांव तुझे
रडतांनाही नांव तुझे
घड्तांनाही नांव तुझे
सांगतेवेळी जीवनाच्या मुखी नांव तुझे
आई रडल्या वाटा तुझ्याविना
जीवन सारे सुने-सुने तुझ्याविना
आसवांनाही वाटे असावी आई माझी
रडतांना माझेही अश्रु पुसणारी
आई तुच जगजननी
तुझ्या अस्तित्वाविना
जन्म न घेती
झाड,पान,फ़ुले,वेली अन प्राणी
उघड्या संसाराला
धैर्याने झाकणारी तु
फ़ाटक्या चोळी-लुगड्याला
गाठी बांधुन खरी संसारकर्ती तु
एवढेच नव्हे फ़क्त महत्व तुझे
अस्तित्वच नाही तुझ्याविना कुणाचे
नदी-नाले,तेज-वारा,उन-पाउस,उथळ माथे
अन उदरात तुझ्या जगाचे सार खरे
म्हणुनच तुझ्याविना आई
जगाचे अस्तित्वच नाही.
-----------------------***-------------------------

No comments:

Post a Comment