
अभिमानच नाही तर माज आहे माज
मराठी असल्याचा...
थांबा.इथंच चुकतोय आपण
मित्रांनो..माज? ?
अरे भाऊ कसला माज??
स्वत:च्या मातृभाषेचा,संस्
कृतीचा अभिमान
असतो.असावाच लागतो नाहीतर
तर
तो भुमिपुत्र कसला??
पण या अभिमानाला जर आपण माज
म्हणु
लागलो तर आपणच
आपल्यातला उध्दट
मराठी माणसाचे प्रदर्शन करतोय
असं
नाही का वाटत??
आक्रमकता दाखवण्यासाठी
"माज" हा शब्दप्रयोग
मला तरी अयोग्यच
वाटतो.कारण मराठी माणसाचे
रौद्ररुप आजवर
सगळ्यांनी पाहिलेच आहे मग दोन
अक्षरांची ती काय गरज??
अभिमान असावा,स्वाभिमान
असावा पण माज
नको कारण याच मराठी मातीत
जन्माला आलेला आपला सचिन
तेंडुलकर
यशाच्या सर्वोच्च शिखरावर
असुनदेखील
त्याची नम्रता तसुभरही ढळलेली नाही,
तर मग
माझा आवडता खेळाडु सचिन तेंडुलकर
असं गर्वाने
सांगणारे आपण त्याच्याकडुनकाय
शिकलो??
म्हणुन परत एकदा सर्वांना नम्र
विनंती की कोणीही माज आहे असं
म्हणु नये पण
समोरच्याला लाजवेल
ईतका अभिमान मात्र
हवाच..
जय शिवराय../>
जय महाराष्ट्र../>
जय श्रीराम.../>
No comments:
Post a Comment