जीवघेणे सौंदर्य तुझे... - Marathi, Hindi Kavita || मराठी, हिंदी कविता, Jokes, Quotes, Stories. Rohan Banekar.

Breaking

Home Top Ad

Sticky Ad - Desktop only

Friday, June 5, 2020

जीवघेणे सौंदर्य तुझे...


जीवघेणे सौंदर्य तुझे..
ही लाजण्याची अदा..
त्यावर हवेशी झुंजत्या ..
तुझ्या केसांची जादूच जुदा..
💜
डोळ्यात लपलेला झरा..
बघताच गुंततात नजरा..
स्वरातून वाहतो जणू..
मधाच्या पावसाचा सरा..
🧡
गोडवा स्वभावातला बघून..
परत प्रेमात पडावेसे वाटते..
विसरून हे सारे जग..
तुझ्यात हरवावेसे वाटते..
रूप तुझे बघून जणू..
नभातला चंद्रही लाजतो..
रोज आकाशात ढगामागे..
लपून तुला सजतांना बघतो..
💚
रूप तुझे लिहीतांना..
शब्दही मर्यादा सोडतात..
लेखणी आणि कोरे पानं..
एकमेकांशी रोज भांडतात..
💛
कलम रोज नव्याने..
अशक्य प्रयत्न करते..
मनातल्या तुझा चित्राला..
शब्दांचे नवे रंग भरते..

🎋🍃💦🎋🍃🍁🎋🍃🍁🍃🍁🍃🌾🍃🌾🍃

No comments:

Post a Comment