
सावरले किती वेड्या मनाला
तरी जीव तुझ्यात हा गुंततो
तुझ्या मिठीतल्या कुशीत
यायला जीव माझा आतुरतो
चांदणी बनून भिजते तुझ्या नभांत
म्हणून पाहून चंद्राला जीव भुलतो
पावसात तुझ्या आडोशाला रे
यायला जीव हा तुळतुळतो
कोसळत्या सरींत भिजताना
माझ्या काळजात तूच उरतो
दुर असला जर तू माझ्यापासून
तुझ्याविना हा जीव गुदमरतो
वेडावला जीव आता माझा
सख्या तुझ्यासाठीच हुळहुळतो
No comments:
Post a Comment