प्रेम म्हणजे सुंदर पहाट - Marathi, Hindi Kavita || मराठी, हिंदी कविता, Jokes, Quotes, Stories. Rohan Banekar.

Breaking

Home Top Ad

Sticky Ad - Desktop only

Friday, June 7, 2013

प्रेम म्हणजे सुंदर पहाट


प्रेम  म्हणजे सुंदर पहाट
कधीही न हरवणारी जीवनाची वाट..
आयुष्याला पडलेलं गोड स्वप्नं
सगळी उत्तरं सापडणारा मजेशीर प्रश्न..
फुलणारं हसणारं प्रत्येक फूलं
कधी चुकलं तर सावरणारं पाऊलं
नेहमी  ऊगवणारी सुंदर सकाळ
हवीहवीशी वाटणारी रम्य संध्याकाळ..
प्रेम  म्हणजे हवेतला ऊबदार गारवा
अन् जणू दरवळणारा मारवा
अंगावर घ्यावा असा राघवशेला
एकदा घेतला तरी बस्स असा अमृतप्याला...
ऐकत  रहावी अशी हरीची बासरी
अस्मानीची असावी जशी एक परी...
प्रेम  म्हणजे अत्तराची ईवलीशी कुपी
दु:खावरची हळुवार जादूची झप्पी
मैत्री म्हणजे न दिसणारा हातामधला हात
नेहमीकरता असणारी तुझीचं साथ.....
सोबत रहा तू फक्त.. इतकंचं एक मागणं आहे...
तू असल्यावर अवघं जीवन देखील गाणं आहे......

No comments:

Post a Comment