आठवण माझी आली कधी - Marathi, Hindi Kavita || मराठी, हिंदी कविता, Jokes, Quotes, Stories. Rohan Banekar.

Breaking

Home Top Ad

Sticky Ad - Desktop only

Friday, June 7, 2013

आठवण माझी आली कधी


आठवण माझी आली कधी
तर पापण्या जरा मीटून बघ.
सरलेल्या क्षणांमधले 
संवाद जरा आठवून बघ.

आठवण माझी आली कधी
तर त्या वाट वळणाऱ्या वाटेवर बघ
त्या पाउल वाटेवरती
उमटलेली आपली पाउले बघ.

आठवण माझी आली कधी
तर उडणार्या पक्षांकडे बघ.
त्यांच्यासारखाच माझ मन
तूज्याकडे धावत आलेलं बघ.

आठवण माझी आली कधी
तर चांदण्या जरा मोजून बघ.
चांदण्या रात्री घेतलेल्या शपथेचा
शब्द न  शब्द आठवून बघ.

आठवण माझी आली कधी
तर सागरकिनारी जाऊन बघ.
हजारदा किनार्याला मीठीत  घेऊन सुद्धा
परतणाऱ्या नीराश  लाटेच  वीव्ह्लन बघ.

आठवण माझी आली कधी
तर साद मला घालून बघ
तुझ्या अवतीभोवती फीरणार
माझ अस्तित्व जरा जाणवून बघ.

No comments:

Post a Comment