
उडून जाताना पक्षाने
एक घरटं करून जावं
आयुष्याच्या या फांद्यीवर
एखदा तरी प्रेम गीत गाऊन जावं ||धृ ||
अनोळखी पाखरांसंग थोडं रमून जावं
जाणिवांच्या खुणा आठवणीत ठेवून जावं
नित्य स्फूर्ती चैतन्याची घेऊनि
चिवचिवाट प्रेमाचा करून जावं
आयुष्याच्या या फांद्यीवर
एखदा तरी प्रेम गीत गाऊन जावं ||धृ ||
भर उन्हात भरारी घेताना
वाऱ्याची झुळूक संग घेऊन जावं
विरह येतील, संकट ओढवतील,
त्या बरोबर येणार्या वेदनांनाही सामोरं जावं
आयुष्याच्या या फांद्यीवर
एखदा तरी प्रेम गीत गाऊन जावं ||धृ ||
- हनुमंत चव्हाण
( कवी, लेखक )
No comments:
Post a Comment