
उगाच शब्दांना
का त्रास देऊ मी
नाते नावाला जोडणाऱ्यांचा
का खास होऊ मी
आयुष्य गहाण झाले
प्रेमाच्या झोक्यावर
झोका उंच उंच गेला
काळीज तुटले मोक्यावर
उध्वस्त झाली मैफिल ती
जोडलेल्या नात्यांची
उशीर झाला आता
पारख करण्या मोत्यांची
डोळे उघडू नकोस देवा
खूप पाप केले यांनी
पाठी खंजीर खुपसला
अन खूप शाप दिले यांनी
नको कुणाची सोबत
नको कुणाची साथ आता
आयुष्य जगतो एकटा मी
देऊन प्रेमाला लाथ आता
मरणार आहे एक दिवस
चार खांद्यावर जाणार मी
खोट्या प्रेमाचा सारथी
शेवटी अमर होणार मी
No comments:
Post a Comment