
आपण ह्याच मातृभूमीचे भक्त.
तल्लीन होऊ आनंदात मनसोक्त,
दुःख मात्र मलाच भिडू दे.
सख्या मी तुझ्याच सोबत रे....
लक्ष्यावाचून घेऊ नकोस तू माघार,
दाखव धाडस अन् कर वासनांचा संहार.
तुझ्या ध्येयाला असो निष्ठेतेचे पहारे,
त्यासाठीच, सख्या मी तुझ्याच सोबत रे....
आयुष्यात येतील पुष्कळ अडचणी;
तेव्हा धाडसी हवी तुझी चढणी,
आणि गाठ अशीच यशाची शिखरे.
तेव्हाही, सख्या मी तुझ्याच सोबत रे....
भिन्न मार्ग पण वाटसरू एकाच ठावाचे,
पण नको विसरू लोक जिवाभावाचे.
घाबरू नको, क्षणिक तिमीर हे,
कारण
सख्या मी तुझ्याच सोबत रे....
सख्या मी तुझ्याच सोबत रे....
No comments:
Post a Comment