मित्र म्हणजे काय - Marathi, Hindi Kavita || मराठी, हिंदी कविता, Jokes, Quotes, Stories. Rohan Banekar.

Breaking

Home Top Ad

Sticky Ad - Desktop only

Monday, May 11, 2020

मित्र म्हणजे काय

मित्र म्हणजे काय
दोन हात दोन पाय

एक हात मदतीचा
एक  वाम मार्गी गेल्यास
मागे ओढण्याचा

एक पाय सोबत चालण्याचा
एक चुकल्यास मारण्याचा

मित्र म्हणजे काय
निरर्थक गोष्टीना अर्थ लावणारा
अर्थपूर्ण गोष्टीना निरर्थक करणारा

वायफळ गोष्टीना कधीही
न कंटाळणारा
उपदेश दिल्यावर
बोर नको करू म्हणणारा

मित्र म्हणजे काय
वेळ कधीही न पाळणारा
पार्टी ठरवून
मी विसरलो सांगणारा

मित्र म्हणजे काय
खोटे भांडण करणारा
चांगले काही केल्यावर
विश्वास न ठेवणारा

मित्र म्हणजे काय
निसर्गाची सर्वात
चांगली भेट
भिडली मनाला थेट

मित्र म्हणजे काय
भेटले की असतो
नुसता धिंगाणा
कुणालाही काही कळेना

मित्र म्हणजे काय
असा एक श्वास ,
त्याच्यावर संपूर्ण विश्वास

मित्र म्हणजे काय
रंगवलेला कागद
प्रत्येक रंग अगदी अलगद

मित्र म्हणजे काय
झऱ्याचे निर्मळ पाणी
मिळाले न  कोणाला
असा नसेल कोणी

No comments:

Post a Comment