
खूप आशा खूप प्रश्न
मनात घेऊन जगलो
तू अन मी रोज सखे
स्वप्नांत चोरून भेटलो
आपण एकत्र रहावं
जग सोबतीने पहावं
तुला सोबतीला घेऊन
मी चांदण्यात नहावं
हे आता सारे सारे
स्वप्नंच राहिले होते
क्षितिजा पलीकडे
तुझे घर पाहिले होते
विरहाशी गळाभेट
तुझ्यामुळेच झाली
वाऱ्याची दिशा बदलली
कोण राहिला ना वाली
का सांगितलंस तू
प्रेम संपलेल सूर्याला
तू दूर केलंस तेव्हा
जवळ केलं मी दर्याला
आता सूर्याची माझी
जरा गट्टीच झाली
म्हणूनच मी तर तुझी
कायमची सुट्टीच केली
No comments:
Post a Comment