कोणी येतं प्रपोज करतं - Marathi, Hindi Kavita || मराठी, हिंदी कविता, Jokes, Quotes, Stories. Rohan Banekar.

Breaking

Home Top Ad

Sticky Ad - Desktop only

Monday, May 11, 2020

कोणी येतं प्रपोज करतं

प्रपोज केला कोणी
दोष कोणावर आला
जो म्हणाला आपला
आता तोच परका झाला

प्रेम करणं अवघड झालं
प्रेमाच्या घाट वळणावर
कुणी येतं प्रपोज करत
अन कोण नेतं सरणावर

उगाच का त्रास व्हावा
आपलं आपलं म्हणतांना
काळजावर घाव होतो
डोळ्यात असावे भरतांना

शब्द शब्द वेचले जातात
काव्यरुपी या पुस्तकावर
कोणी येतं नशीब लिहून जातं
चुकून कोणत्या मस्तकावर

शेवट प्रेमाचा असा होतो
कधीचं कोणाला कळला नाही
आत्ता पर्यंत हेच खरं झालं
प्रेमात कोणता प्रेमी जळला नाही

No comments:

Post a Comment