
मोठमोठाले उदाहरण ऐकले बापा पायी
मग काय पाप घडले परी माझ्या हाती
जे बाबाचे सुख नाही पडले पाझ्या मनी
सकाळ प्रहरी उठवतोस बाबा तू आम्हासी
दिवसभर तू शेतात एकटा राबतो ते खरी
पण दारू पिऊन का तंग करतो आम्हासी
एवढे काय अमृत जडले आहे त्या दारू पायी
मोल्यवान वस्तू टाकतो तू मातीत मिसळऊनी
दोन घास सोबत खाण्यास झुरतो आम्ही किती
लेकरं तुझे तू कशे विसरतो या नशा तूनी
मोठमोठ्या मुलींवरी उगारतो हात कशा पायी
आसव तर नाही दिसणार तुझ्या डोळ्यांनी
पण किंचाळ्या पण पडत नाही का तुझ्या कानी
बाबा तुझे हे रूप कुठेच तर वर्णिले नाही
कशा पायी हे दुःख देतो तू माझ्या पदरी
बाबा नावच कलंकित करतोय तू आजवरी
No comments:
Post a Comment