
गल्लीत तु .. बोळात तु...
मित्रांच्या घरात तु.
नगरातील प्रत्येक कोपर्यात तु..
नाहीस तु अस कशात तु?
ह्रदयात तु. मनात तु...
मित्राच्या स्मरणात तु ...
तनाच्या प्रत्येक कोनात तु
नाहीस तु अस कशात तु?
चेंडूत तू फळीत तु.
यष्टीत तु धावात तु
मित्रांच्या खेळात तू
मैदाना मैदानात तु...
नाहीस तु अस कशात तु?
आता सांग कुठे नाहिस तु?
सगळीकडे आहेस तु
प्रत्येक कणात तु
प्रत्येक क्षणात तु
आणि प्रत्येक मित्राच्या ठोक्यात तु..
No comments:
Post a Comment