प्रीत तुझी हवी आहे - Marathi, Hindi Kavita || मराठी, हिंदी कविता, Jokes, Quotes, Stories. Rohan Banekar.

Breaking

Home Top Ad

Sticky Ad - Desktop only

Tuesday, June 23, 2020

प्रीत तुझी हवी आहे




साथही तुझी हवी आहे मला
फक्त तू नकोस मला
साथही तुझी हवी आहे
शांत स्थळी एकांतवेळी
प्रीत तुझी हवी आहे

शृंगार प्रेम नको मला
वात्सल्य प्रेम हव आहे
सांजवेळी सूर्यास्ताला
प्रेमगीत हव आहे

दवबिंदू नकोत मला
रिमझिम पाऊस हवा आहे
रानफुलाला सुखावणारा
गार वारा हवा आहे

फक्त शब्द नकोत मला
अर्थ त्यातला हवा आहे
तिमिरातून तेजाकडचा
मार्ग त्यातून हवा आहे

सृष्टी सारी नको मला
द्रुष्टी तुझी हवी आहे
तुझ्या डोळ्यात दिसणारा
विश्वास मला हवा आहे

तुझा दुरावा नको मला
सहवास तुझा हवा आहे
खचनाऱ्या माझ्या मनाला
आधार तुझा हवा आहे

क्षण तुझे नकोत मला
प्रत्येक क्षणी तू हवा आहेस
वेळ तुझी नको मला
वेळीस तू हवा आहेस

No comments:

Post a Comment