तुझ्या टपोर डोळ्यात, माझं इवलंसं गाव - Marathi, Hindi Kavita || मराठी, हिंदी कविता, Jokes, Quotes, Stories. Rohan Banekar.

Breaking

Home Top Ad

Sticky Ad - Desktop only

Tuesday, June 23, 2020

तुझ्या टपोर डोळ्यात, माझं इवलंसं गाव



तुझ्या टपोर डोळ्यात, माझं इवलंसं गाव 
तुझी झेप वादळाची, माझी तुझ्यावरी धाव 

तुझ्या मिठीत आकाश, तुझ्या मुठीत आकाश
माझ हवेत आकाश, तुझ्या कवेत आकाश
तुझ्या पावलांचे ठसे, गडे क्षितिजा पल्याड
तुझी बहरलेली बाग, माझ सुकलेल झाड 

तुझी बहरलेली बाग, तुझी चर्चा जागोजाग
तुझा श्रावण जोरात, माझ्या मनात आग
   
सार जग तुझ्यापाठी, माझी आग तुझ्यासाठी
माझी झोप तुझ्यासाठी, माझी जाग तुझ्यासाठी
जीव जगतो उगाच, साद देशील म्हणुनी
वाट पाहतात डोळे, तूच येशील म्हणुनी
   
मला खुनवितो वेडा, तुझ्या गावाचा किनारा
हाती लागेना किनारा, माझी चिखलात नाव
तुझ्या टपोर डोळ्यात, माझं इवलंसं गाव 

1 comment:

  1. ही तुमचीच कविता आहे का?

    ReplyDelete