आई घेणा मला स्मार्ट फोन - Marathi, Hindi Kavita || मराठी, हिंदी कविता, Jokes, Quotes, Stories. Rohan Banekar.

Breaking

Home Top Ad

Sticky Ad - Desktop only

Saturday, June 20, 2020

आई घेणा मला स्मार्ट फोन


आई घेणा मला स्मार्ट फोन 
शाळेत न जाता मला शिकायचं आहे
मोठा व्हायचा आहे
शाळा, क्लासेस बंद आहेत
फोन शिवाय अभ्यास होत नाहीये

आई घेणा मला स्मार्ट फोन 
फोन नाही घेतला तर मी शिकणार कसा
शिकलो नाही तर मोठा होणार कसा 
सांग ना आई करू तरी ग काय मी आई 
स्मार्ट फोन शिवाय आता शिकता येत नाहीये

आई घेणा मला स्मार्ट फोन 
शाळेतल्या सर्व मुलांकडे आहे स्मार्ट फोन 
मला पण घे आई स्मार्ट फोन मी पण शिकेल
काहीपण कर लोन घे
पण घेच तू स्मार्ट फोन मला

आई घेणा मला स्मार्ट फोन 
Syllabus पुढं निघून जात आहे
आता तरी घे मला स्मार्ट फोन तू
ह्या Corona Virus मुळे शाळा झाली बंद
Online शाळा, क्लासेस मुळ झाली पंचायत 

आई घेणा मला स्मार्ट फोन 
शाळा आता चालू होणार नाहीये ग आई 
घरचं आपली शाळा झाली आहे
माहित आहे ग आई स्मार्ट फोन आहे महाग
पण तो आपल्याला घ्यावाच लागेल 

आई घेणा मला स्मार्ट फोन 
आई घेणा मला स्मार्ट फोन 

© कवी - रोहन बाणेकर - पुणे 
२०/०६/२०२०

No comments:

Post a Comment