जेव्हा कधी कोणावर प्रेम करशील - Marathi, Hindi Kavita || मराठी, हिंदी कविता, Jokes, Quotes, Stories. Rohan Banekar.

Breaking

Home Top Ad

Sticky Ad - Desktop only

Monday, June 22, 2020

जेव्हा कधी कोणावर प्रेम करशील


जेव्हा कधी कोणावर प्रेम करशील   
तुला माझी आठवण होईल   
तुझ्याही डोळ्यांत तेव्हा   
माझ्यासोबतच्या क्षणांची साठवण होईल   

आठवणी जेव्हा माझ्या   
तुला एकांतात कवटाळतील   
तुझ्याही नजरा तेव्हा   
माझ्या शोधात सैरावैरा पळतील   

जेव्हा त्याला प्रेमाने बघशील   
तेव्हा तुला मी दिसेन...   
त्याला शोधणा‍-या तुझ्या नजरेत   
तेव्हा फक्त मी असेन...   

तेव्हा तुला माझे शब्द पटतील   
तुझ्याही नजरेत तेव्हा   
माझ्यासाठी अश्रू दाटतील...   

माझ्यासाठी रडणारे ते अश्रू   
तेव्हा तुझ्यावरच हसतील   
कारण तुझ्या गालांवर टिपणारे त्यांना   
ते ऒठ तेव्हा माझे नसतील...!!!

No comments:

Post a Comment