ऐक ना....... तुझ्या कविता माझ्या स्वप्नात येतात.. - Marathi, Hindi Kavita || मराठी, हिंदी कविता, Jokes, Quotes, Stories. Rohan Banekar.

Breaking

Home Top Ad

Sticky Ad - Desktop only

Sunday, June 14, 2020

ऐक ना....... तुझ्या कविता माझ्या स्वप्नात येतात..


ऐक ना.......
तुझ्या कविता माझ्या स्वप्नात येतात..
फिकट सोनेरी रंगाच्या पाकळ्या होवून
मी अलगद त्यांना ओंजळीत भरून घेते तर त्या लाजून गुलबटतात....
मी घेते त्यांचा गंध श्वासभरून
शब्दांचा कोवळा गंध...
जो तुझ्या असण्याचे भान देतो..
मग ती एकेक पाकळी
मी सोडून देते वाऱ्याच्या कुशीत लहरण्यासाठी
तर तिला फुटतात इवलाले पंख
अन् उमलून येते प्रत्येक पाकळी
आतून
स्वयंप्रकाशी होताना
अन् मग साऱ्या पाकळ्या फिरू लागतात
माझ्याभोवती रिंगणात
वाऱ्याच्या झूळकी माखून..
त्यावेळी मी कवितेतून उजळलेलं ,
काजव्याचं झाड झालेली असते...

No comments:

Post a Comment