
मी मेल्यावर मला तू पाहू नकोस,
माझी कुठलीही आठवण तू जवळ ठेवू नकोस..
मी दिलेली साताजन्माची वचने तू खरी मानू नकोस,
मी पाहिलेली सगळी स्वप्ने तू रंगवू नकोस..
कारण ?????
माझे तर आयुष्यचं खुप छोटे आहे,
तुला साथ देण्याचे वचन माझे खोटे आहे..
फक्त माझ्या चितेलाआग द्यायला मात्र तू विसरु नकोस,
माझ्या चितेची झालेली राख कदाचितस्पर्श करेल तुला..
ती मात्र तू ह्रदयाशिवाय कुठेचं लावू नकोस,
विसर गं कायमचेचं शोना मला..
माझी आठवण काढून तू रडत बसू नकोस,
माझ्या कुठल्याही भेटवस्तू तू जवळ ठेवू नकोस..
आपली शेवटची भेट आहे गं शोना ही,
आता मला परत भेटण्याचा तू प्रयत्न ही करु नकोस......
No comments:
Post a Comment