#भिजायला मला ही आवडेल फक्त सोबत #तू हवास - Marathi, Hindi Kavita || मराठी, हिंदी कविता, Jokes, Quotes, Stories. Rohan Banekar.

Breaking

Home Top Ad

Sticky Ad - Desktop only

Thursday, July 9, 2020

#भिजायला मला ही आवडेल फक्त सोबत #तू हवास


💞🍀#भिजायला मला ही आवडेल
फक्त सोबत #तू हवास...💞🍀

💞🍀थेंब बनून #फांदीवर..फांदीवरून पानावर..
पानावरुन #ओघळायला मला ही आवडेल
फक्त सोबत #तू हवास..💞🍀

💞🍀पानातून कळीत..कळीतून #फुलात..
फुलातून #गंधात बागडायला मला ही आवडेल
फक्त सोबत #तू हवास...💞🍀

💞🍀गंधातून भासात..#भासातून स्वप्नात
स्वप्नातून #स्पर्शात रमायला मला ही आवडेल
फक्त सोबत #तू हवास...💞🍀

💞🍀भरल्या आभाळातून...#गडगडणा-या मेघातून
पाऊस बनून #कोसळायला मला ही आवडेल
फक्त सोबत #तू हवास...

🍀💞थुई थुई #अंगणभर..नारळीच्या झावळीवर
पाणी होऊन #साचायला मला ही आवडेल
फक्त सोबत #तू हवास...💞🍀

💞🍀भिजल्या मनाने..#ओलेत्या अंगाने
आडोशाला #निथळायला मला ही आवडेल
फक्त सोबत #तू न तूच हवास...🍀💞

No comments:

Post a Comment