कोण म्हणतं कठीण असतं तिला समजून घेणं - Marathi, Hindi Kavita || मराठी, हिंदी कविता, Jokes, Quotes, Stories. Rohan Banekar.

Breaking

Home Top Ad

Sticky Ad - Desktop only

Saturday, January 30, 2021

कोण म्हणतं कठीण असतं तिला समजून घेणं


कोण म्हणतं कठीण असतं तिला समजून घेणं,
देहाच्या नागमोडी वळणावरून हळूवार जाणं,
चाचपून अनुभवावं ते सुंदर रेखीव लेणं,
उधळून द्यावं तिच्यावर हे सगळंच जिणं!
श्वास तिचा थरथरेल,
जीव तुझा हुरहुरेल,
श्रांत होऊन मग कधी,
बाहुपाशही ढळेल..
तू फक्त ऐकून घे,
जे होईल ते टिपून घे,
कूस बदलून निजू नकोस,
डोळ्यांत तिला साठवून घे..
तुझं जे म्हणणं असेल,
तिच्या पाठीवर बोटांनी सांग,
हळू हळू का होईना पण,
लागेल तुला तिचाही थांग,
थोडं तिच्या मनासारखं वागुन तर बघ,
आखलेल्या वाटांवरून चालून तर बघ,
प्रेम तुला दिसेल तिचंही नक्की,
समोर आलेली बट तिच्या कानामागे सारून तर बघ!
सोपी असते रे ती, आपल्यालाच कळत नाही.
ओढाळ आपलं मन कळलं तरी वळत नाही!

No comments:

Post a Comment