#कोमल कोमल #ओठांनी तु
किती हळुहळु #बोलतेस
जणु #बागेतल्या काट्यांमधुनी
#फुलांना #नाजुकपणे वेचतेस
स्वप्ने तुझीही आहेत ती
स्वताला किती तु #सांभाळतेस
काळोख्या रातीला साजेशी
जणु #चांदणीच मला भासतेस
भोळ्या मनाची कथा तुझी
ठाव माझ्या #काळजाचाच घेतेस
खोटे तुला बोलता येत नाही ,
तरीही उगाच प्रयत्न का करतेस
कळी उमलते मनात माझ्याही
जेव्हा कधीही तु #हसतेस
#गालावर खळी असावी तुझ्या जी
कोमल #चेह-यावर तु छान खुलवतेस...!💞

No comments:
Post a Comment