ओंजळीतले क्षण केवळ प्रेमाचे होते नकळत आवड्लेलास तू - Marathi, Hindi Kavita || मराठी, हिंदी कविता, Jokes, Quotes, Stories. Rohan Banekar.

Breaking

Home Top Ad

Sticky Ad - Desktop only

Monday, February 8, 2021

ओंजळीतले क्षण केवळ प्रेमाचे होते नकळत आवड्लेलास तू

 

ओंजळीतले क्षण
केवळ प्रेमाचे होते
नकळत आवड्लेलास तू
माझे मलाच कळले नव्हते...
माळलेल प्रत्येक फुल
सुगंध मलाच देत होते
शेअर केले सारे क्षण
फक्त प्रेमानेच भारले होते...
डोळ्यांत पाणी तुझ्या
मनं माझे रडत होते
हसलास जेव्हा तू
सारे जीवन हसले होते...
अवचित आवडलेला तू
जीवन एक स्वप्न होते
रात राणी कधी बहरली
माझे मलाच कळले नव्हते...

No comments:

Post a Comment