
तुला पाहिलं अन मन भरून आले
आनंदला जणू उधाण आले
नकळत नजर चेहऱ्यावर जाताच
हसू गालावर हळूच उमटले
हात हातात घेऊन तुझ्या सोबत चालावे
असे मनाला वाटले
पण आजू बाजूचा कानोसा घेत मन हळूच थंडावले
तुझ्या माझ्या भेटीने मन हर्ष हर्ष झाले
तुझ्या एका नजरेने बघ आज हृदय हेलावले
स्पर्शाने तुझ्या शहारे ही लाजले
तुझे चोरून पाहणे मनाला फार आवडले
तुझ्या सोबत असताना कसलेही भान नाही उरले
बघता बघता वेळेनेही आपले निरोप घेतले
सोडून तुला जाताना मन थोडेसे दुखावले
मागे वळून पाहू नकोस मनाला मन सांगू लागले
थोडे पुढे जाताच इशारे तुझे मागून आले
तुझे हात पसरताच मी स्वतःला तुझ्या कुशीत पाहीले
पुन्हा तुझ्या स्पर्शाने सर्वांग भारावून गेले
तुझ्या येण्याने आज पुन्हा मन सुखावले....
No comments:
Post a Comment