
जिवनात येऊदे कितीही संकटे
पण तु नेहमी हसत राहा .
नाही मिळाले पंचपक्वान जरी खायला
तुझ्यासोबत चटणी भाकरी ही गोड लागे मला
हौस नाही मला सोन्या चांदिच्या दागिन्यांची
तुझ्यासारखा हिरा आहे आयुष्यात माझ्या
नाही राहिले बंगल्यामध्ये तरी चालेल मला
हातात हात घेऊन तुझ्यासोबत चालायला कधीही आवडेल मला
नाही झाली माझी स्वप्ने पूर्ण तरीही चालेल मला
पण तुझ्या स्वप्नांना पंख फुटलेले पाहायला कधीही आवडेल मला
तु आयुष्यभर रडवलेस तरीही चालेल मला
पण तुझ्या डोळ्यांत पाण्याचा एक थेंब ही नाही पाहवणार मला
महागडे हॉटेल्स , खरेदी याची हौसच आहे कोणाला
तुझ्याकडे डोळे भरून पाहण्यात आभाळभर सुख आहे मला
नाही ओळख दाखवलीस चार चौघात तरी चालेल मला
तु फक्त माझाच आहेस हि भावनाच पुरेशी आहे मला
नाही आयुष्य भर जवळ घेतले तरीही चालेल मला
पण शेवटच्या क्षणी मरण्यासाठी तुझीच मिठी हवी आहे मला
No comments:
Post a Comment