आपल्या मधुचंद्राची रात्र सखे,
मी स्वप्नात ग पाहिलेली...
स्वप्नातल्या त्या
झोपाळ्यावर,
तु बसली होतीस लाजलेली...
खोलीत सर्वत्र पसरला होता,
फूलांचा मधुर तो गंध...
त्या गंधाला विसरुन सखे,
झालो तुझ्यात मी धुंद...
तुझ्या केसांची बट मागे सारुन,
तुझ्या मानेवर मी ओठ टेकवले...
माझ्या ओठांच्या स्पर्शाने सखे,
अंग तुझे शहारले...
तुझ्या ओठांचा स्पर्श मला ,
हवाहवासा वाटत होता...
तो कोमल स्पर्श मला सखे,
स्वर्गसुखात नेत होता...
तुझा गोरा रंग सखे,
डोळे माझे दिपवत होता...
क्षणा क्षणाला माझा संयम,
अधिक अधिकच सुटत होता...
अधिक अधिकच सुटत होता...

No comments:
Post a Comment